3-4 माणसांसाठी लागणारे साहित्य
1) 1 वाटी बारीक रवा
2) 1 ते दीड वाटी पाणी
3) 3 चमचे तूप किंवा तेल
4) 1 वाटी साखर
5) वेलचीपुड आवड़ीनुसार
6) खाण्याचा पिवळा रंग ( ऐच्छिक )
7) पाइनएप्पल इंसेन्स
8) 1 वाटी दूध ( ऐच्छिक )
9) 1केळ बारीक केलेल ( ऐच्छिक )
10) काजू, बदाम, मणुके, बेदाणे केलेले बारीक काप
कृती :-
1) कढईत तूप किंवा तेल गरम करून त्यामध्ये रवा मंद आचेवर गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यावा.
2) रवा भाजत असताना दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करून घ्यावे.
3) रवा चांगला भाजून झाला की त्यात गरम केलेले पाणी टाकावे आणि गुठल्या होवू न देता ढवळावे.नंतर कढ़ईवर झाकण ठेवून 3-4 मिनिटे वाफ काढावी.
4) झाकण काढून रवा चांगला शिजला की त्यात साखर आणि वेलचीपुड टाकून मिश्रण एकत्र करावे.
5) नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध, बदाम, काजू,मणुके,बेदाणे, खान्याचा पिवळा रंग, पाइनएप्पल इंसेन्स टाकून मिश्रण एकत्र करुन 2 मिनिट कढ़ईवर झाकण ठेवून वाफ काढवी.
टिप :-
1) दूध आणि पाणी एकत्र गरम करुन रवा भाजला की त्यात टाकू शकतो.
2)साखर आवड़ीनुसार कमी जास्त करू शकतो.
3) खाण्याचा पिवळा रंग फक्त शिऱ्याला पिवळा रंग एण्यासाठी टाकत आहोत.